News Research
शुक्रवार, 24 अक्टूबर 2025
पत्रकार शंकर मराठे को दीपावली के शुभ अवसर पर मिला गोल्ड एवार्ड
मंगलवार, 1 जुलाई 2025
अभिनेत्री तब्बू द्वारा कल्याण ज्वैलर्स का नया शोरूम लॉन्च
बुधवार, 31 जनवरी 2024
सिनेमा लोकशाहीचा ट्रेलर व म्युझिक लॉंच सोहळा संपन्न
शंकर मराठे, मुंबई - ३१, जानेवारी २०२४ - लोकशाही चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. हीच उत्सुकता पुढे ताणत ३० जानेवारी २०२४ रोजी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा दणक्यात पार पडला आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या जबरदस्त ट्रेलर आणि चित्रपटातील गाण्यांने रसिकांचं मन जिंकून घेतलं असून सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.
अंबरनाथच्या शिवमंदिरासाठी पुरातत्व खात्याची धावाधाव
शंकर मराठे - मुंबई, ३१ जानेवारी २०२४ - सुमारे एक हजार वर्ष जुने असलेले अंबरनाथचे शिवमंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ नमुना म्हणून अभ्यासकांना खुणावत असते.
मंगलवार, 31 मई 2022
श्री अर्जुन दादा भोईर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
शनिवार, 28 मई 2022
जनसेवेचे व्रत घेऊन काम करणारा नगरसेवक श्री अर्जुन दादा भोईर
शंकर मराठे - मुंबई, 28 मे 2022 - कार्यसम्राट नगरसेवक श्री अर्जुन दादा भोईर यांनी बी.के.नगर मध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी व्यवस्थितपणे पाणी जाण्यासाठी ब्लोग टाकून सीमेटकोबा केला आहे. त्यामुळे आता पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या येणार नाही. अर्जुन दादा भोईर यांचे मनःपूर्वक आभारी आहोत.
शुक्रवार, 11 दिसंबर 2020
टीसीएसच्या अनिरुद्ध दत्त यांनी 'टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझ'चे विजेतेपद जिंकले
शंकर मराठे - मुंबई, ११ डिसेंबर २०२०: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मुंबईचे अनिरुद्ध दत्त यांनी टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझ २०२० मध्ये क्लस्टर ८ चे अंतिम विजेतेपद जिंकले आहे. भारतातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक प्रसिद्ध बिझनेस क्विझ असलेल्या टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझचे यंदा प्रथमच संपूर्णपणे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते.
क्लस्टर ८ अंतिम फेरीत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचे स्पर्धक सहभागी झाले होते. अंतिम फेरी अतिशय अटीतटीची ठरली. भाग्यशाली विजेत्याला ३५,००० रु. रोख बक्षीस देण्यात आले, तसेच आता त्यांना राष्ट्रीय महाअंतिम फेरीसाठीच्या उपांत्य फेरीमध्ये देखील भाग घेता येणार आहे. डिस्कव्हरी कम्युनिकेशन्स इंडियाच्या सिद्धार्थ बॅनर्जी यांनी उपविजेतेपद पटकावले असून त्यांना १८,००० रु. रोख बक्षीस देण्यात आले.
नव्या सर्वसामान्य परिस्थितीमधील आव्हानांचा यशस्वीपणे मुकाबला करत टाटा क्रुसिबलने यंदाच्या वर्षी पहिल्यांदा ही क्विझ व्हर्च्युअल फॉरमॅटमध्ये आयोजित केली. नव्या ऑनलाईन फॉरमॅटनुसार देशभरातील स्पर्धकांना १२ क्लस्टर्समध्ये विभागण्यात आले होते. ऑनलाईन प्रिलिम्सच्या दोन फेऱ्या पार पडल्यानंतर १२ क्लस्टर्समधून वाईल्ड कार्ड फायनल्ससाठी १२ स्पर्धकांची निवड करण्यात आली असून त्यापैकी पहिले ६ स्पर्धक १२ ऑनलाईन क्लस्टर अंतिम फेऱ्यांमध्ये भाग घेतील. १२ क्लस्टर्सपैकी प्रत्येक क्लस्टरच्या विजेत्याला उपांत्य फेरीत सहभागी होता येईल आणि सरतेशेवटी उपांत्य फेरीतील सहा विजेते राष्ट्रीय महाअंतिम फेरीत पोहोचतील. टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझची राष्ट्रीय महाअंतिम फेरी डिसेंबर २०२० मध्ये होईल. राष्ट्रीय विजेत्याला २.५ लाख रुपयांचे महापारितोषिक तसेच प्रतिष्ठित टाटा क्रुसिबल ट्रॉफी देऊन गौरवण्यात येईल. सर्व अंतिम फेऱ्यांचे प्रक्षेपण टाटा क्रुसिबलच्या फेसबुक, ट्विटर आणि युट्युब चॅनेल्सवर करण्यात येणार आहे.
विख्यात क्विझमास्टर 'पिकब्रेन' गिरी बालसुब्रमण्यम यांनी आपल्या अनोख्या शैलीमध्ये या क्विझचे सूत्रसंचालन केले.
टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझची यंदाच्या वर्षीची बक्षिसे टाटा क्लिकमार्फत देण्यात येत आहेत. क्विझची तपशीलवार माहिती याठिकाणी उपलब्ध आहे - www.tatacrucible.com




